• Founder

  C. A. Ram Daware

 • Founder C.A. Ram Daware

  Speaking in Career Guidance Program for Entrepreneurs

 • Entrepreneurs

  Listening in Career Gidence Program .

About

श्री गोंदेश्वर चॅरिटेबल ट्रस्ट, सिन्नर, जि.नाशिक.

संस्थेविषयी थोडक्यात माहिती

 • संस्थेचा नोंदणी क्रमांक – संस्थेची नोंदणी हि मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५१ खाली दि.२७/१२/२०१० रोजी झाली असून संस्थेचा नोंदणीक्रमांक E-१२३९ हा आहे.
 • आयकर कायदा १९६१ कलम १२ (अ) अनुसार नोंदणी आयकर विभागाकडे झालेली आहे व त्याचा नोंदणी क्रमांक. (पि.आर.ओ.)/१२AA/२०११-२०१२/५७/५६.
 • आयकर कायदा १९६१ कलम ८० जी अंतर्गत संस्थेस देणगी (Donation) देणाऱ्या व्यक्तीस आयकरातून

सुट मिळते.  संस्थेचा आयकर कायदा १९६१ कलम ८० जी अंतर्गत नोंदनी क्रमांक. ना/(सी.आय.टी-I/६०/८०)

८० जी/२०११-२०१२/२९३७.

संस्थेचा पॅन नंबर –AAKTS0404Q हा आहे.

 

संस्था करीत असलेली विविध कार्य व विविध उपक्रम

अपंगासाठी पावसाळी सहलीचे आयोजन- धडधाकट तरुण मौजमजा करण्यासाठी जगात सर्वत्र सहलीला जातात आणि धमाल धिंगाणा घालतात मात्र अपंगांना निसर्ग सौंदर्य पाहाता यावे आणि तीर्थक्षेत्राचे दर्शन घेता यावे म्हणून संस्था दरवर्षी पावसाळी सहलीचे आयोजन अपंगासाठी मोफत करते. या सहलीत १०० च्या वर अपंग राज्याच्या विविध भागातून सहभागी होतात.

मोफत अपंग वधूवर परिचय मेळाव्यांचे आयोजन– संस्था दरवर्षी अपंगांसाठी वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन करते, विशेष म्हणजे हा वधु वर परिचय मेळावा कोणत्या धर्मासाठी किंवा जातीसाठी नसून सर्व जाती धर्माचे अपंग यात सहभागी होतात व त्यातून मुक्या भावनांच्या रेशीम गाठी बांधल्या जातात.

नेत्र तपासणी- संस्थेच्या वतीने ग्रामीण भागात नेत्र तपासणी शिबीर आयोजित केले जाते व त्या शिबिरात आढळून आलेल्या रुग्णांचे मोफत मोतीबिंदू ऑपरेशन संस्थेमार्फत केले जाते. गरीब व आर्थिकदृष्टया मागास वर्गासाठीच मोफत मोतीबिंदू ऑपरेशन संस्थेमार्फत केले जाते. तसेच मरणोत्तर नेत्रादानासंबंधी जनजागृती करणे व त्याचा प्रचार व प्रसार करणे. संस्थेने येणाऱ्या काळात १ लाख मोफत मोतोबिंदू शस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

रक्तदान शिबीर- ‘रक्तदान सर्वश्रेष्ठ दान’ हे ब्रिदवाक्य हाती घेवून संस्थेमार्फत वेळोवेळी रक्तदान शिबीर आयोजित केली जातात. राक्त्दानासंबंधी प्रचार व प्रसार करण्याचे काम संस्था करते.

महिला आरोग्य:-संस्था विषेश करून ग्रामीण भागातील महिलांचे आरोग्य कसे उंचावेल यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करते. त्यात आहारासंबंधी तज्ञांचे मार्गदर्शन, स्त्रियांसाठी विविध रोगांवरील शबिरे आयोजित करणे, किशोर वयातील मुलींमध्ये होणारे नैसर्गिक बदल व त्यासंबंधी त्यांना मार्गदर्शन करणे.

महिला बचत गटांची निर्मिती करणे व त्यांना मार्गदर्शन करणे:-संस्थे मार्फत महिला बचत गटांची निर्मिती केली जाते व त्यांना विविध व्यवसायांचे मार्गदर्शन केले जाते, शासकीय योजनांची माहिती व बचत गटांसाठी उपलब्ध कर्ज पुरवठ्याबद्दल मार्गदर्शन केले जाते.

तरुण तरुणींसाठी रोजगारासाठी व उद्योगधंद्यांसाठी मोफत मार्गदर्शन व चर्चासत्र आयोजित करणे.

खेळाच्या विविध स्पर्धा आयोजित करणे, खेळाडूंना प्रोत्साहन देणे, गरीब व गरजू खेळाडूंना विविध खेळांची अत्याधुनिक माहिती देणे.

ग्रामीण भागातील आरोग्य उंचावण्यासाठी योग शिबीरांचे आयोजन करणे.

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे गात तयार करून त्यांना विविध व नवजीवन शेती तंत्रज्ञानाची माहिती करून देणे. शेतकऱ्यांसाठी व शेतीसाठी केंद्र व राज्य सरकारच्या विविध अनुदान व प्रोत्साहन योजनांची माहिती देणे. फळबाग, विदेशी भाजीपाला, पशुपालन, शेती संबंधी इतर जोडधंदे याबाबत शेतकऱ्यांना माहिती देणे. तसेच ह्या सर्वांची माहिती शेतकर्यांना व्हावी त्यासाठी शेतकरी मासिक सुरु करणे.

आदिवासी गावे दत्तक योजना:- संस्थेतर्फे  ५ त ६ आदिवासी गावांचीपाहणी केली आहे. सदर आदिवासी गावांमध्ये शौचालये नाहीत, अनेक तरुण नशेच्या आहारी गेले आहे, तरुणांना रोजगार नाही, गावात दवाखाना नाही, अंधश्रध्दा मोठ्या प्रमाणात आहे. अशी अदिवशी गावे दत्तक घेवून त्या गावात विविध सुविधा उपलब्ध करणेसाठी संस्थेने पुढाकार घेतला आहे.

वरील सामाजिक उपक्रम चालविण्यासाठी आर्थिक मदतीची व पैशांची गरज असते, आपण आपल्या यथाशक्ती प्रमाणे संस्थेस मदत करू शकता. आम्ही आपणास खात्री देतो कि आपण दिलेली देणगी हि गरीब, गरजू व चांगल्या कामांसाठी वापरली जाईल.

* देणगी देण्याची पद्धत*

रोख स्वरुपात – आपण रोख स्वरुपात देणगी देवू शकता. रोख देणगी देतांना संस्थेची देणगी पावती लगेचच घ्या व देणगी घेणाऱ्या व्यक्तींचे नाव व नंबर आपल्या संदर्भासाठी लिहून घ्या.

आपल्याला आयकर कायदा कलम ८० गी अंतर्गत सुट हवी असल्यास आपल्याला चेकद्वारे देणगी देणे बंधनकारक आहे. चेक “श्री गोंदेश्वर चॅरिटेबल अँण्ड एज्युकेशनल ट्रस्ट ” ह्या नावाने द्यावा. चेक पास झाल्यानंतर आपणांस त्याची पावती आपल्या पत्यावर पाठवली जाईल.